२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात: ईडीकडून जॅकलिन फर्नांडिसला दुसऱ्यांदा समन्स बजावूनही गैरहजर!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी 15 ऑक्टोबर रोजी जॅकलीन ईडीसमोर हजर होणार होती. पण जॅकलिनने आज तिच्याकडे काही महत्त्वाचे काम आहे असे सांगून, ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे.

यामध्ये नोरा फतेही गुरुवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचली. या दरम्यान 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोरा फतेहीची सुमारे आठ तास चौकशी केली. नोरा फतेही सकाळी 11.30 वाजता ईडीच्या दिल्ली कार्यालयासमोर हजर झाली आणि रात्री 8.30 पर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.

नेमक हे प्रकरण काय आहे..

200 कोटींच्या खंडणीचे आहे, त्यातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून एवढी मोठी रक्कम वसूल केली होती. यामुळे तो तुरुंगात आहे. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही सापडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणास्तव लीना पॉलचीही तासन्तास चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सांगण्यात आले की, पॉलने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदितीची फसवणूक करण्यासाठी सुकेशला कथितपणे मदत केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सुकेश आणि त्याच्या पत्नीशिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे.