सुल्ली डिल्स अॅपवर मुस्लीम तरुणींचा लिलाव; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

मुंबई: सुल्ली डिल्स या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या अॅपवर80 हून अधिक महिलांची ‘बोली’ लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी असाच सुल्ली डिल्स नावाचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा दुसरा सुल्ली डिल्स तर नाही ना? असं बोललं जात आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे.
मुस्लिम महिलांची खासगी माहिती, फोटो टाकून इंटरटेनटवर त्यांच्या ट्रोलिंगचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. पुन्हा एकदा अशाप्रकारची तक्रार समोर आली. त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी केंद्र सरकारच्या आयटी, गृह मंत्रालय आणि मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची विनंती केली.
आधी नावाने ट्रोल करणारे आता नावाने महिलांन त्रास देत आहेत. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि ट्विटरनं त्यासाठी मदत करावी असं प्रियंका चतुर्वेदींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी 30 जुलै आणि 6 सप्टेंबरला माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. ही पत्रंही त्यांनी ट्वीटद्वारे शेअर केली आहेत.