पैशांची गरज असल्याचे सांगत, नगरसेवकाची ऑनलाईन फसवणूक करणारा अटकेत

10

पिंपरी: मुंलीच्या डोक्यावरून ट्रक गेला असून ती वायसीएम रुग्णालयात ऍडमिट आहे. उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत नगरसेवकाकडे आर्थिक मदत मागितली. नगरसेवकाने तातडीने ऑलाईनद्वारे पैसेही पाठवले. मात्र, नंतर आपली फसवणून झाल्याचे लक्षात येताच नगरसेवकाने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सांगवी पोलिसांनी नगरसेवकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला आज नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. सुरज वाघ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (रा. विनायकनगर, पिंपळे गुरव) असे फसवणूक झालेल्या नगरसेवकांचे नाव आहे. ते प्रभाग क्रमांक ३१ मधून निवडून आले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने कांबळे यांना मोबाईलवरून फोन केला. मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेला असून तिला वायसीएम रुग्णालयात ऍडमिट आहे. उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.

कांबळे यांनी आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ते एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्या फोनवरून गुगल पे मार्फत आरोपीला सहा हजार ५०० रुपये पाठवले. त्यानंतर आरोपीने कांबळे यांच्याकडे पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी केली असता ते प्रत्यक्ष वायसीएम रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे भाग्यश्री बाविस्कर या रुग्णाबाबत चौकशी केली असता या नावाचा रुग्ण तेथे ऍडमिट नसल्याचे समोर आले. त्यानंतर यातून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून दोन आठवड्याच्या आत आरोपीला थेट नाशिक मधून बेड्या ठोकल्या. आरोपी वाघ याने चार नगरसेवकांकडे अशा प्रकारे पैसे मागून त्यांना गंडा घातला असल्याचे म्हटले जाते. मात्र त्याबाबत कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.