बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका; अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे.  याप्रकणात मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात जामीनावर सुनावणी होणार आहे. यामुळे बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची एनसीबीने छापा मारला आहे. लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीच्या नावामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडची नकारात्मक छाप जगासमोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंकी पांडेच्या मुलीची अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. अनन्या पांडेची लवकरच चौकशी होणार असल्याचं सुत्र म्हणत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह हे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला दुपारी 2 वाजता एनसीबीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आहे.

आर्यन खान प्रकरणाशी हा नवी एनसीबीची धाड असल्याच म्हटलं जात आहे. आर्यन खानच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या चॅटमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख असल्याच म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडकडे एनसीबीची करडी नजर असल्याचं म्हटलं जात आहे.

शाहरुख आर्यनच्या भेटीला तुरुंगात

अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र केवळ दहा मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!