“देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज लागत नाही” ; भाजप मंत्र्याचे बेताल वक्तव्य

मुंबई: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधन खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या आवाक्या बाहेर जात आहे. त्यामुळे कोरोना संकटानंतर आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. अशाच भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचे पुन्हा एकदा बेताल वक्तव्य समोर आलं आहे. “देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज लागत नाही” असं बेताल वक्तव्य या मंत्र्याने केलं आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी असं या मंत्र्याचे नाव आहे. या मंत्र्याच्या बेताल व्यक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील देशात पेट्रोल २०० रुपयांवर पोहचल्याने ट्रिपल सीट बाईक प्रवासाला परवानगी द्या अशी मागणी या आसाम भाजपचे प्रदेशाध्यक्ष भावेत कालिता यांनी केली होती. त्यामुळे पेट्रोल -डिझेल दरवाढीवर केंद्र सरकारची पाठराखण करताना भाजपाचे मंत्री बेताल वक्तव्य करताना दिसतायत.
उपेंद्र तिवारी यांनी असा दावा केला की, “पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालीच नाही, देशातील ९५ टक्के लोकं पेट्रोल-डिझेलचा वापरत नाहीत, काही मोजकेच लोक चारचाकी गाडीचा वापरत करतात. बेरोजगारीच्या प्रश्नावर तिवारी म्हणाले, राज्यात वर्तमानकाळात जो परीक्षा पास करेल तो अधिकारी बनेल.” उरई येथे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी त्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढी आणि बेरोजगारीसंदर्भात एका प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना उपेंद्र यादव यांनी, “९५ टक्के लोकं पेट्रोलचा वापर करत नाही असं बेताल वक्तव्य केलं. केंद्र सरकारने १०० कोटी पेक्षा अधिक लसीचे डोस मोफत दिले आहेत. जर याची प्रति व्यक्तीसोबत तुलना केली असता सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती खूप कमी आहेत.”
Read Also :
-
100 कोटी लसीचा विक्रम, या यशामागे 130 कोटी देशवासीयांचे कर्तव्य – पंतप्रधान…
-
‘आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली’ –…
-
लसीकरणामध्ये भारत जगभरात अव्वल; शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून…
-
जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानांचा नाद करु नये; अजित…