भाजपला मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

लातूर: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

लातूर जिल्हा बँकेत 19 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्ज बाद करण्याचं राजकारण केलं गेलं. या विरोधात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू असं भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी सांगितले आहे .

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित सहकार पॅनेलच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी भाजपाचे अर्ज बाद केले असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे सहकार पॅनलचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख हे बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष केला.

Read Also :