संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दणका; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

6

मुंबई: एसटीच्या संपात  सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची, कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या  कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या  कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

लातूर आणि यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करुन, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून  बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.

या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचारी यांनी कामगार न्यायालय, लातूर आणि यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. कामगार न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता कामावर हजर न झालेल्या कामगारांच्या समस्यांसमोर वाढ झाली आहे. राज्यातील इतर ठिकाणी अशा प्रकारे बडतर्फीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.