बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी औरंगाबादचं नाव बदललं – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद: शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठ वक्तव्य केल आहे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहराचं नाव आधीच बदललं असल्याचं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्ह्टलं आहे.

त्याचबरोबर खैरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार यांना देखील इशारा देत म्हटलं आहे की, इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचं नाव बदलणारच आहोत असा आक्रमक पवित्रा माजी खासदार खैरे यांनी घेतल्याने पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दरम्यान, खैरे यांच्या या विधानानंतर जलील नेमकं काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आला आहे. त्यामुळे, आता या घडलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून या घटनेला राजकीय रंग देण्याच काम सध्या राजकारणी करत असल्याच दिसत आहे.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेसंदर्भात  आक्रमक पवित्रा धरण केला असून, जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!