इंधन दरवाढीचा भडका! ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागणार

मुंबई: देशात महागाईचा उच्चांक नोंदवला गेला आहे. पेट्रोल आणि डिझेल, सीएनजी आणि पीएनजी गॅस दरवाढीनंतर आता एक एक गोष्टींसह सर्वच महाग होत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. नागरिक महागाईच्या बोझ्याखाली दबत चालला आहे.आता दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार असे संकेत मिळत आहेत. कारण एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकराला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
दिवाळीच्या तोंडावर एसटी भाडेवाढ करण्याच्या तयारीत असून 17 टक्के भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. तो भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एसटीच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.
१२ तास काम करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले गेले आहे. अशातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवास महागल्याने गावी परतणाऱ्या सामान्य नागरिकांना याची झळ सोसावी लागणार आहे. तसेच एसटी कर्मचारी संप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
Read Also :
-
महागाईचा भडका, तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली
-
मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय
-
माण तालुक्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण
-
मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार? ‘हे’…
-
आर्यन खान प्रकरण: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी