ईडी म्हणजे पान-तंबाखूचं दुकान झालंय; माझ्या घरी देखील धाड पडू शकते – प्रणिती शिंदे

सोलापूर: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी ही पान, तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात ईडी, सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. त्यामुळे तुम्ही जर भाजपच्या विरोधात बोललात, तर तुमच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते. माझ्या घरी देखील पडू शकते, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्या सोलापुरातील एक सभे बोलत होत्या.

ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलं आहे आहे ते लोक आज खुशाल बाहेर फिरत आहेत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत. भाजपचे लोक केवळ आग लावण्याचं काम करत आहेत, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे. देशात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं असून या भीतीपोटी सर्वजण घरात बसले आहेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी आज मी त्यांच्या विरोधात बोलत आहे, तर माझ्या घरावर देखील ईडीची धाड पडू शकते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. प्रणिती शिंदे एवढ्यावरच न थांबता ईडी म्हणजे पान-तंबाखूचं दुकान झालंय, असा घणाघात प्रणिती शिंदेंनी केला. कुणाच्याही घरात घुसतात आणि लोकांना उचलून नेतात. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलं आहे ते लोक आता खुलेआम फिरताना दिसत आहेत. तर निर्दोषांना त्रास दिला जात आहे. समझने वालोंको इशारा काफी है, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Read Also :