पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे; निलेश राणेंची टीका
मुंबई: कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून सरकारने तब्बल 750 रुपये जाहीर केलेत. बरं त्यासाठीही त्यांनी अनेक नियम अटी शर्थी ठेवल्या आहेत. कोरोनाकाळात स्वत:चा, आपल्या कुटुंबाचा, आप्तेष्ठांचा विचार न करता हेच मुंबई पोलिस दिवसरात्र काम करत होते. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. आता मुंबई पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांना दिवाळी बोनस केवळ ७५० रुपये, अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये जास्तच दिले म्हणावं लागेल कारण ठाकरे सरकार आहे. बोलण्यासारखं आता राहिलं नाही, आता पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाही हे लोकं.’ अशी टीका निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर केली आहे.
ठाकरे सरकार कडून मुंबई पोलिसांना दिवाळी बोनस केवळ ७५० रुपये, अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये जास्तच दिले म्हणावं लागेल कारण ठाकरे सरकार आहे. बोलण्यासारखं आता राहिलं नाही, आता पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाही हे लोकं. pic.twitter.com/3ilvIohjMw
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2021
मुंबई पोलिसांना दिवाळीनिमित्त मुंबईतील सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे.
Read Also :
-
भाजपला ‘दे धक्का’, शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!
-
नात्याला काळीमा फासणारे कृत्य: नऊ वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार
-
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल;…
-
ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून फक्त 750 रुपये
-
तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय – नारायण…