तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय – नारायण राणे

8

सिंधुदुर्गः शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी आपले जिवन संपवल्यामुळे राज्यात पुन्हा एकादा त्यांच्या पगाराचा विषय समोर आला आहे. आता यावर राजकारण तापले आहे, आता नारायण राणेंनी अनिल परबांवर नाव न घेता टीका केली आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधलाय. एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करतायत, पगार नाही, खरं तर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढं त्यानं कमवलंय, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे, असंही म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर प्रहार केलाय.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.