नाशिकची मृण्मयी ठरली ‘फर्स्ट मिस इंडिया टिन’

नाशिक: मृण्मयी दीपक बर्वे ही गोवा येथे झालेल्या फर्स्ट मिस इंडिया टिन स्पर्धेमध्ये  तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत एकुण ११ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. फर्स्ट इंडिया चॅनलने मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन केले होते प्रथमच देशपातळीवर ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेला प्रतिसादही अभुतपुर्व मिळाला. १९ वर्षे वयोगटाखालील स्पर्धकांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ७८ स्पर्धकांमधुन मुंबई  येथे तिन स्पर्धकांची निवड करण्यात आली.

दरम्यान गोवा येथील नोवोटेल रिसोर्ट मध्ये फर्स्ट इंडिया चॅनलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदिश चंद्र, प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री हिना खान, के. एन. फर्नांडिस, दिप्ती गुजराल, डबु रजानी, या परिक्षकांच्या पॅनलने या तीन स्पर्धकांशी प्रश्नोत्तरे, गुणवत्ता यावर आधारित स्पर्धकांशी संवाद साधला.

या स्पर्धेत नाशिकरोड लोकमान्य नगर परिसरातील कु. मृण्मयी दीपक बर्वे हिला ३ रा क्रमांक मिळाला. प्रथम रैना सिक्री तर शुभिता धनेटा ही द्वितीय क्रमांकाची विजेती ठरली. मृण्मयी वर्षे हीस १ लाख रुपये रोख सन्मानचिन्ह मुकूट देऊन सन्मानित करण्यात आले. मृण्मयी बर्वे हिचे शालेय शिक्षण सेंट फिलोमिना हायस्कुल मध्ये तर १२वी पर्यंतचे शिक्षण एच. पी.टी. नाशिक येथे तर पुढील शिक्षण ती मुंबई येथे सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये द्वितीय वर्ष कला शाखेतून घेत आहे. कुठलाही वारसा नसतांना मृण्मयीने एक स्पर्धा म्हणुन भाग घेतला. केवळ गुणवत्तेच्या बळावर मृण्मयीने मिस इंडिया स्पर्धेचा तृतीय क्रमांक मिळवुन आपला ठसा उमटविला आहे.

Read Also :