कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू

11

भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये कमला नेहरु रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. सोमवारी रात्री उशीरा लागलेल्या या आगीत चार चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात यश आलं. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रुग्णालयात आग लागल्यानं लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अनेक नवजात बालके आणि डॉक्टर्स आत अडकले होते. यातील काहींना सुरङित बाहेर काढण्यात आलं. आग आटोक्यात आणण्यासाठी फतेहगढ, बैरागढ, पुल बोगदासह इतर भागातील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.

कमला नेहरु रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली तेव्हा वॉर्डमध्ये तब्बल ५० लहान मुलं होती. आगीची घटना समोर येताच लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर आगीमुळे लहान मुलांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला तसंच मोठ्या संख्येनं रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. प्रशासनाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नेमकं कारण समोर येईल.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.