नवाब मलिकांच्या कुटुंबीयांचा अंडरवर्ल्डशी संबंध; देवेंद्र फडणवीसांचा दावा

15

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी देखील फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या वर अंडरवर्ल्ड शी संबंधित असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांना नवाब मलिक नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता असे फडणवीस यांनी म्हंटल. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? असा सवाल फडणवीसांनी केला. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.

कुर्ला येथे एलबीएस रोडवरील 1 लाख 23 हजार स्केअर फूटची जागा होती. त्याला गोवावाला कंपाऊंड म्हणतात. या जमीनीची एक रजिस्ट्री स़ॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली, अशी माहिती फडणवीसांनी दिलीये. या जमिनिची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली. हे दोघेही दाऊदची माणसं होती. ही सॉलिडस कंपनी मलिकांची आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचं पेमेंट केलंय 20 लाखांचं. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं आहे.”, असं ते म्हणाले. 1993 मध्ये आम्ही लोकांचे चिंधडे उडताना पाहिले. हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत. त्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार आहे. त्याचबरोबर मी राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनाही हे पुरावे देणार आहे. त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.

Get real time updates directly on you device, subscribe now.