हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. ईडीकडून करण्यात येणारी हि दुसरी छापेमारी आहे. आज पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे धाडसत्र सुरु केले. सुमारे सात ते आठ अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.

कोल्हापूर येथील साखर कारखाना खरेदी व्यवहार गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीं केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतवण्यात आला असलयाचे सोमय्या यांनी म्हटले आहे. या पूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढवा येथील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यलयात ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. येवेळीही ईडीने काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारीवरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुंन मुश्रीफ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा कार्यकर्ते करत आहेत.

किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती. आजही मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.