राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

15

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. त्यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, अशी विनंतीही केलीये. “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं.

राज्यात एकाच दिवसात 2,172 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 75 दिवसांनंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत तर कोरोनाने रेकॉर्ड मोडला आहे. येथे एका दिवसात 1,377 रुग्ण आढळले आहेत. 216 दिवसांनंतर मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 63 टक्के रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहे.

नुकतंच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या, मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.