टी-२० विश्वचषक २०२१ मधून बाहेर काढल्यानंतर, पहिल्यांदाच युझवेंद्र चहल म्हणाला…

3

मुंबई: टी-२० विश्वचषक २०२१ च्या गट सामन्यांमध्येच पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली. पंरतू स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला T20 विश्वचषक 2021 मधून वगळले आहे. चहल हा टी-२० फॉरमॅटमधील भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. चहलने टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर आता पहिल्यांदाच चहल उघडपणे बोलला आहे.

युझवेंद्र चहल म्हणाला, ‘गेल्या चार वर्षात मला टीम इंडियातून एकदाही वगळले नाही आणि त्यानंतर इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी मला अचानक संघातून वगळण्यात आले. मला खूप वाईट वाटलं. मी दोन तीन दिवस डाऊन होतो. पण, त्यानंतर मला माहित होते की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ येणार आहे.  ‘मी माझ्या प्रशिक्षकांकडे गेलो आणि त्यांच्याशी खूप बोललो. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी मला सतत प्रोत्साहन दिले. माझ्या चाहत्यांनी सतत प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्या, ज्यामुळे मला बळ मिळाले. मी माझ्या स्ट्रेंथला बैक करून या संभ्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी जास्त काळ नाराज राहू शकलो नाही, कारण त्याचा माझ्या आयपीएल फॉर्मवर परिणाम झाला असता.

युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचा खेळाडू मानला जातो. दोघेही आरसीबीमध्ये एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलला टी-२० विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. T20 विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलला वगळून राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या फिरकीपटूंवर विश्वास दाखवला. राहुल चहरला खेळण्याची संधीही मिळाली नाही, तर मी वाईटरित्या फ्लॉप ठरलो.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या घोषणेदरम्यान मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाले होते, ‘आम्हाला संघात एक लेग-स्पिनर हवा होता, जो वेगाने चेंडू टाकू शकेल. जो वेगवान खेळपट्टीवरून चांगली पकड मिळवू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही चहलऐवजी राहुल चहरची निवड केली. मात्र टी-20 विश्वचषकात युझवेंद्र चहलच्या जागी निवडकर्त्यांनी निवडलेल्या फिरकीपटूला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.