किशोर राजेनिंबाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोरराजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी काढली. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

निंबाळकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्हावरे येथे झाले त्यानंतर त्यांनी बी. एस्सी. ऍग्रीकल्चरचे शिक्षण राहुरी विद्यापीठातून घेतले व पुढील पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. 1987 मध्ये त्यांची अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे अन्नछत्र पूर्ण करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सोलापूरला दोन वर्षे प्रांताधिकारी, नंतर पंढरपूरला प्रांताधिकारी म्हणून काम केले. पंढरपूर देवस्थानात अनेक चांगले बदल घडविले. मंदिराच्या गाभाऱ्यापासून दर्शनबारी, लाडूचा प्रसादवाटप, स्वच्छता, अन्नछत्र आदी विषयांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे जकात अधिकारी म्हणून काम केले. माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे खासगी सचिव, नंतर ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उपसचिव, सचिवपदावर काम केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!