MPSC परीक्षा ढकलली पुढे , आयोगाचे पत्र जारी

2

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे, रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबत आयोगाने परिपत्रक जारी करुन माहिती दिली. 

एमपीएससीची मुख्य परीक्षेचा पेपर आता 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी केली होती. अखेर ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जातील, असे आयोगाकडून जाहीर करण्यात आल आहे.