अवकाळी पावसाचा मुंबई लोकलला फटका; पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने

मुंबई: महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही अनेक भागांत बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यात हवामान खात्याकडून मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे.

मात्र या पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकलला सहन करावा लागतोय. मुंबईत बुधवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे देखील उशीराने धावत आहेत. यात बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धावणाऱ्या सर्व जलद गाड्या जवळपास पावूण तास उशीराने धावत आहेत.

यामुळे स्लोक ट्रॅकवरच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी १०. २० नंतर बोरिवली रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या सर्व जलद लोकल जवळपास अर्धा ते पाऊण तास उशारीने धावत असल्याचे पाहायला मिळाले. वांद्रा स्थानकातून १०.५४ ला सुटणारी चर्चेगेट फास्ट लोकल आज ११. २० होऊन गेले तरी वांद्रे स्थानकावर पोहचली नव्हती. या मनस्तापाचा सामना प्रवाशांना सहन करावा वागतोय.

तर वांद्रे स्थानकातूनचं बोरिवलीच्या दिशेने सुटणारी ११.१५ ची स्लो लोकल आज ११. २७ ला वांद्रे स्थानकात दाखल झाली. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील फास्ट ट्रॅकवरून धावणाऱ्या जवळपास सर्वचं लोकल उशीराने धावत आहेत. परिणामी स्लो ट्रॅकवरील गाड्यांना याचा फटका सहन करावा लागतो. कोलमडलेल्या रेल्वे वेळपत्रकामुळे आज मुंबईकरांना कामावर आणि आपल्या निर्धारित ठिकाणी पोहचण्यासाठी खूप उशीर होतोय. विस्कटलेल्या रेल्वे वेळपत्रामुळे काही प्रवाशांनी सरळ घरचा रस्ता धरला. मात्र कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!