वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक पोस्ट, म्हणाली…..

5

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवला नुकताच पितृशोक झाला आहे. सायली संजीवच्या वडिलांचे नुकताच निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवने सोशल मीडियावर आपल्या लाडक्या बाबासाठी भावनिक पोस्ट केली आहे. सायली संजीवचा वडिलांवर खूप जीव होता. सायलीचे वडिलांप्रती असलेले प्रेम तिच्या पोस्टवरुन कायम दिसून यायचे. सायलीचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान 31 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

वडिलांच्या निधनामुळे सायलीला खूप दु:ख झाले आहे. या दु:खातून ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. बाबाच्या निधानंतर सायलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. सायलीने या इन्स्टा पोस्टमध्ये आपल्या लाडक्या बाबासोबतचे अनेक पोस्ट शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये सायलीने असे लिहिले आहे की, ‘संजीव 26/07/1958 – 30/11/2021. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.’ सायलीची ही इन्स्टाग्राम पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये सायलीने बाबासाठी एक कविता देखील लिहिली आहे. ‘दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर…’ सायलीने या पोस्टमध्ये शेअर केलेल्या ओळी या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटातील आहेत. सायलीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी मराठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या बाबांना श्रद्धांजली वाहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.