ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट, सोशल मीडियावर होतेय तुफान चर्चा!

मुंबई: बॉलिवूडमध्ये ब्युटी विथ ब्रेन्स असं जर कुणाला म्हटलं जात असेल तर ते नाव आहे सुष्मिता सेन. ही अभिनेत्री तिच्या आर्या सीरिजच्या दुसऱ्या सिझनमुळे चर्चेत आहे. अशातच आणखी एका कारणाने तिची चर्चा होते आहे ते आहे तिचं ब्रेकअप. होय सुष्मिता सेनचं ब्रेक अप झालं आहे. अशात तिच्या इंस्टाग्राम पोस्टचीही चर्चा आहे.

इंस्टाग्रामवर तिने तिच्या ब्रेक अपची माहिती दिली आहे. तसंच तिची पहिली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमुळे सुष्मिता आणि रोहमन यांच्यात बरेच खटके उडत होत होते असा अंदाज नेटकरी लावत आहेत. सुष्मिताने स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यापुढे असं म्हटलं आहे. शांतता ही सर्वात सुंदर आहे, माझं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे असं म्हणत तिने स्मायलीही पोस्ट केला आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन या दोघांचं ब्रेक अप झालं आहे. सुष्मिता सेनने यासंदर्भातली माहिती इंस्टावरच दिली होती. आम्ही आधी मित्र होतो आणि पुढेही मित्रच राहू बाकी सगळं संपलंय अशा आशयाची एक पोस्ट तिने लिहिली होती. रिलेशनशिप बऱ्याच काळापूर्वी संपलं असंही तिने म्हटलं होतं त्यामुळे सुष्मिता सेनचं ब्रेक अप झालं हे जगाला कळलं होतं. सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन आता त्याच्या मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे.

अनेकांनी सुष्मिता आणि रोहमनच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. सुष्मिता आणि रोहमन यांची जोडी सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होती. हे दोघंही लवकरच लग्न करतील असं बोललं जात होतं. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात जवळपास १० वर्षांचं अंतर होतं. मात्र तरीही त्यांच्यातील बॉन्डिंग नेहमीच चांगलं होतं. एवढंच नाही तर रोहमन सुष्मिताच्या मुलींना स्वतःचं कुटुंब मानत होता. दरम्यान अद्याप या दोघांचं ब्रेकअप का झालं याचा खुलासा झालेला नाही. मात्र सुष्मिताने आज जी पोस्ट लिहिली आहे त्यावरून या दोघांमध्ये अनेकदा खटके उडत असावेत त्यामुळेच हे दोघे वेगळे झाले असावेत असा अंदाज लावला जातो आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!