‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता, नेमकं कारण काय?

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. त्यांच्या गावरान बाज त्यांच्या लेखणीत दिसतो. कधी शाहरुख खानच्या समर्थनात पोस्ट तर कधी राजकीय पोस्टमुळे किरण माने सतत चर्चेत असतात. या पोस्टमुळे त्यांच्यावर टीका देखील होते. मात्र किरण माने याला भिक घालताना दिसत नाही. आता खरं तरी त्यांना राजकीय भूमिका घेणं नडलं आहे. त्यांना थेट मुलगी झाली हो   मालिकेतून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समोर आलं आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केले आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा ! त्यांना कदाचित हेच सांगायचा आहे की, तुम्ही मला कितीही संपवायचा प्रयत्न केला तरी मी नव्याने जन्म घेणारचं.. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिय उमटत आहेत. किरण माने यांच्या भूमिकेचे सोशल मीडियावर समर्थन केले जात आहे. शिवाय त्यांच्या चाहत्या वर्गाने देखील त्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे.किरण माने यांनी एक दैनिकाशी बोलताना सांगितले की, होय मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला  चॅनेलने ही माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

‘देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो.

बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो. तुम्ही फेसबुकवर शोधलं, #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील. ज्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन त्यातील विद्रोही विचारांची उकल मी आज्या परिस्थितीशी जोडून केलेली आहे. त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, ज्या विचारधारेनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं ज्ञानोबांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला. त्या विचारधारेचे लोक पेटून उठतात. मला खूप त्रास झाला या ट्रोलर्सचा, असं माने म्हणाले.