स्पृहाच्या कमेंट ‘ऑफ’ तर प्रार्थनाचे चाहते ‘नाराज’

200

मराठी चित्रपट सृष्टीतील आपला मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी आणि प्रार्थना बेहेरे. अनेक सिनेमे, मालिकांमधील यांच्या अदाकारीच तोंड भरून कौतुक महाराष्ट्राच्या जनतेने वेळोवेळी केलं आहे आणि भविष्यातही करतील यात शंका नाही, पण जेंव्हा एखादा कलाकार ज्याला महाराष्ट्रातील  हजारो लाखो युवा चाहते फॉलो करतात तेंव्हा त्याने आपण नक्की कोणत्या जाहिराती स्वीकाराव्यात आणि त्यातून समाजात नक्की आपण काय संदेश पोहोचवत आहोत याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. 


काल अभिनेत्री स्पृहा जोशी कडून मॅकडॉल आणि आज अभिनेत्री प्रार्थना बेहरे कडून ब्लेंडर या अल्कोहोल कंपन्यांची जाहिरात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून करण्यात आली आहे. प्रार्थनाच्या पोस्टवर फॉलोअर्सने नाराजी व्यक्त केली असून, स्पृहाच्या कमेंट ऑफ असल्याने चाहत्यांना व्यक्त होण्याकरिता मार्ग  दिलेला नाही. ऐन दिवाळीतील  या पोस्ट आता चर्चेचा विषय बनत आहेत. 

काय आहे प्रकार ?

पेड पार्टनरशीप /  पेड प्रमोशन नावाचं एक रेव्हेन्यू मॉडेल हे खास सोशल मीडियासाठी  तयार करण्यात आले आहे. सेलिब्रिटींसाठी आणि ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत अशा फेमस पर्सोनालिटीजसाठी एक्सट्रा इन्कम मिळवून द्यायचं उत्तम साधन आहे, ज्यामध्ये  तुमच्या फॉलोअर्सची संख्या पाहून एका पोस्ट साठी कंपन्यांकडून  एक किंमत ठरविण्यात येते  ज्यामध्ये  दिलेली जाहिरात किंवा प्रोडक्टचा फोटो / व्हिडीओ संबंधित सेलिब्रिटीने पोस्ट करायचा असतो. अनेक कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी याचा वापर प्रभावी माध्यम म्हणून करतात.  लॉकडाऊनमुळे चित्रपट सृष्टीही आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनेक कलाकार या पेड प्रमोशनला उत्पन्नाचे माध्यम म्हणून पाहत आहेत.  

https://www.instagram.com/p/CHnSJkPF9Om/?igshid=kunh5c1wq6vl


https://www.instagram.com/p/CHmSniyHHTD/?igshid=447e8i6hsc3x