कतरिना कैफच्या एंगेजमेंट रिंगची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित!

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल अखेर 9 डिसेंबर 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे कॅट आणि विकीचा शाहीविवाह सोहळा पार पडला. दोन्ही स्टार्सनी स्वतः सोशल मीडियावर लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करत लग्नावर शिक्कामोर्तब केला. दोघांचे फोटो समोर येताच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. दोघांच्या या रोमँटिक फोटोंनी सर्वांची मनं जिंकली.

कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झालाय. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सर्वजण विकी आणि कतरिना यांच्या फोटोंचे कौतुक करत आहेत. या शाही विवाह सोहळ्यात सर्वांचे लक्ष कतरिना कैफच्या एंगेजमेंट रिंगकडे  गेले. सध्या तिच्या या रिंगची जोरदार चर्चा सुरु आहे. तिची ही रिंग सर्वांना खूप आवडली असून त्याची किंमत जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.

कतरिना कैफच्या एंगेजमेंट रिंगमध्ये नीलम या रत्नांचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याचसोबत या रिंगमध्ये हिरे देखील पाहायला मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाच्या या खास रिंगची किंमत 9800 USD आहे. जी भारतीय चलनानुसार 7,40,735 रुपयांची आहे. मात्र, त्यावर अद्याप ठोस शिक्कामोर्तब झालेले नाही. यासोबतच कतरिना कैफच्या हिऱ्याच्या देखील जोरदार चर्चा होत आहे ते देखील सर्वांना खूप आवडले आहे.