बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी
मुंबई: प्रभू रामचंद्र मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे चार जण होते. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवलं पाहिजे. राम मंदिर आंदोलनात या चौघांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता या चौघांनाही भारतरत्न देऊन गौरवलं पाहिजे असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.
राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना बाबरी पाडल्याचा गर्व आहे मला आहे. आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी 6 डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला गर्व बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशिद होती तिथे मंदिर उभारलं जातं याचा आम्हाला गर्व आहे.
मी यामध्ये माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, डॉक्टरकीचा पेशा आणि त्यामधून मिळाला असते असे कोट्यावधी रुपये मी या कामासाठी सोडून दिल्याचा मला गर्व आणि आनंद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करियर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला गर्व आहे असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.
‘चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं. यापैकी पहिले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरे आहेत अशोक सिंघल, तिसरे योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरख पीठाधीश्वर अवैधनाथजी तर चौथे होते अयोध्येचे रामचंद्र परमहंस असं तोगडिया यांनी सांगितलं.या चौघांसोबत माझं खास नातं आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेन की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्तेत आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी करावी’ असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.