उद्धव ठाकरे म्हणतात, आदित्यने माझा ताण बराच हलका केलाय, भाजप नेते म्हणतात जनतेचा ताण वाढला

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीच्या मणक्याबाबत नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर हिवाळी अधिवेशात त्यांना हजर राहता आले नाही. तसेच त्यावेळी महत्वाचा बैठका सुद्धा झाल्या परंतू आजारी असल्याने त्यांना हजरी लावता आली नाही, खूप दिवसांनी त्यांनी 1 जानेवारी रोजी नगरविकास खात्याच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आणि यानेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं. म्हणाले की आदित्यने माझा ताण बराच हलका केलाय. आता यावरु भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय.
“आता आदित्य आहे. जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि केवळ काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबई म्हणून, मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जे काम सुरु केलं. रस्त्यांचं काम कसं सुरु आहे, नालेसफाईचं काम कसं चाललं आहे, सौंदर्यीकरणाचं काही असेल तर तिथे कसं सुरु आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देतो. हे पाहत मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्यांची कामं, साधारण ही कामं मध्यरात्रीनंतर सुरु होतात. आता दिवसाही कामं होतात. पण नालेसफाईचं काम त्या काळात काही ठिकाणी नाल्यात उतरुनही पाहिलं आहे. मग दहिसर नदीचं काम असेल, अजून कुठलं काम असेल. आता हा माझा ताण आदित्यने पूर्णपणे कमी केला आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“तुमच्या पावलावर पाऊल ठेवत ते देखील मंत्रालयात पाऊल ठेवत नाहीत. जनप्रतिनिधी हे तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी नाही तर जनतेचं टेन्शन कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे तुमचं टेन्शन कमी झालं असलं तरी जनतेचं टेन्शन वाढलंय हे नक्की”, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.