धक्कादायक ! बर्थ-डे पार्टीला बोलावून तरुणीवर केला बलात्कार

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर बलात्काराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हादरलं आहे. बर्थ-डे पार्टीला  बोलावून 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या तळजाईच्या जंगलात ही घटना घडली आहे. पीडित तरुणीनं सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. शुभम सीताराम शिंदे (वय-19 वर्ष, रा. धनकवडी) असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. आरोपी शुभम याचा 5 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यानं वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगून पीडितेला तळजाईच्या शेवटच्या बसस्टॅन्ड परिसरात बोलावलं होतं. पीडित तरुणी ठरल्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बसस्टॅन्डवर पोहोचली होती. तिथे आरोपी शुभम आणि त्याचा मित्र प्रतीक माने उभे होते. नंतर आरोपी, त्याचा मित्र आणि तरुणी तळजाईच्या जंगलात गेले.

तिथे शुभमने बर्थ डेचा केक कापला. नंतर दोघांनी पीडित तरुणीला दारु पाजली. थंडी वाढत असल्यानं पीडित तरुणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपी शुभम यानं तरुणीवर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेच्या सगळा प्रकार लक्षात आला. पीडित तरुणीनं पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी शुभम शिंदे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सहकारनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!