मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा विद्यार्थिनींच्या पुढील शिक्षणासाठी स्तुत्य पुढाकार ; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित

19

पुणे : राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात एका अत्यंत स्तुत्य सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विशेष पुढाकारातून शहरातील ३०० गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

या दिमाखदार कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते सर्व पात्र विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले. या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

उपस्थित विद्यार्थिनी आणि पालकांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षणाच्या बळावर आपल्या लाडक्या विद्यार्थिनींची स्वप्ने साकार व्हावीत, याच पवित्र भावनेतून हा शिष्यवृत्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण हीच समाजातील परिवर्तनाची खरी ताकद असून, प्रत्येक गुणवंत व गरजू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि समाज या दोघांनीही एकत्रितपणे कार्य केले पाहिजे.

या कार्यक्रमास शहर सुधार समिती अध्यक्षा स्मिता वस्ते, नगरसेवक अमर आवळे, नगरसेविका लता गौड, प्रियंका शेडगे, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, प्रसाद पानसे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.