रवी शास्त्रीचा मोठा खुलासा; मला प्रशिक्षकपद मिळू नये म्हणून 2017 मध्ये प्रयत्न केले गेले

3

मुंबई: रवी शास्त्री  हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदापासून दुरावल्याचे दिसत आहे. प्रशिक्षक म्हणून अखेरच्या टी-20 विश्वचषकात दिसलेल्या शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील काही लोकांना आपण प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेंच्या जागी शास्त्री यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले.

59 वर्षीय रवी शास्त्री म्हणाले, ‘बीसीसीआयमधील काही लोकांनी असे प्रयत्न केले होते, जेणेकरून मला ही जबाबदारी मिळू नये’. डंकन फ्लेचर यांनी पद सोडल्यानंतर अनिल कुंबळे यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. त्यावेळी रवी शास्त्रीही या शर्यतीत सहभागी झाले होते. त्यानंतर शास्त्रींच्या जागी अनिल कुंबळेंला  प्राधान्य देण्यात आले. विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर कुंबळेने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोन दिवसांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. रवी शास्त्री म्हणाले, ‘माझ्या दुस-या कार्यकाळात मोठा वाद निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी निवड केली होती, पण 9 महिन्यांनंतर त्यांना पुन्हा माझ्याकडे यावे लागले, ही त्या लोकांसाठीही लाजिरवाणी बाब होती अस मत त्यांनी व्यक्त केल.

प्रशिक्षक शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. यादरम्यान भारतीय संघाने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि यावर्षी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. याशिवाय भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.