क्रिकेटप्रेमींची टी- २० विश्वचषकाची प्रतीक्षा आता संपली… अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच रंगणार विश्वचषकाची धूम

51
मुंबई : क्रिकेटप्रेमींची टी- २० विश्वचषकाची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या रविवारपासून वेस्ट इंडिज व अमेरिका येथे  टी- २० विश्वकरंडकाची धूम रंगणार आहे. या चषकासाठी सर्व २० संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. सर्व देशांचे खेळाडू हे यजमान देशात दाखल झाले आहेत. आता सराव सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानसोबत भिडणार आहे.
टी – २० विश्वचषकातील संघांचे गट पुढीलप्रमाणे :
 
अ गट :- भारत पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
 
ब गट : – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
 
क गट : – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा , पापुआ न्यू गिनी
 
ड गट : – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
 
टी – २० विश्वचषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे :
रोहित शर्मा – कर्णधार, हार्दिक पंड्या – उपकर्णधार, ऋषभ पंत – यष्टीरक्षक, संजू सॅमसन – यष्टीरक्षक, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, चहल , अर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान
रविवारी २ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच विश्वचषक खेळवला जाणार आहे.
 
 

Get real time updates directly on you device, subscribe now.