भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका! अजित पवार यांच्या उपस्थितीत 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव: सावळमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी भाजपला लगावलाय. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!