परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला देताना पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. पडळकरांनी पवारांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन डिवचलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावी अशी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. यासाठी मागील १ ते २ महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. एसटीला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांसोबत पवारांनी खुलेआम चर्चा केली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि एसटीला पुर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यावरुन आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला देताना पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचलं आहे. दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा स्वतः कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून विषय सोडवावा असा सल्ला पडळकरांनी अनिल परब यांना दिला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला दिला आहे. पडळकर म्हणाले की, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एकजूटीने लढा दिला आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळे शरद पवार यांना तुमच्या विषयाबाबत खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडले, असे पडळकर म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!