जितेंद्र आव्हाडांच वादग्रस्त वक्तव्य; माझा ओबीसींवर विश्वास नाही, आरक्षण मागणीसाठी मैदानात लढायला ते नव्हते!

20

मुंबई: ओबीसींवर माझा विश्वास नाही. आरक्षण मागणीसाठी ज्यावेळी लढायचं होत त्यावेळी महार आणि दलित समाज लढला. ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ठाण्यातील ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आव्हाड यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘ओबीसींवर माझा खरं तर विश्वास नाही. ज्यावेळी आरक्षण मागणीसाठी लढायचं होतं. त्यावेळी ते मैदानात नव्हते. फक्त महार आणि दलित समाज लढायला होता. कारण ओबीसींना त्यावेळी लढायचं नव्हतं. त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की त्यांना आपण श्रेष्ठ आहोत असं वाटतं. हे त्यांना माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्याला देवळात सुद्धा येऊ दिल जात नव्हतं. ते सर्व विसरून आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. केवळ घरातून व्हॉटसअँपकरून चालणार नाही तर केंद्राशी दोन हात करावं लागणार आहे. रस्त्यावर उतरावं लागणार आहे,’ असेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड  यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावळकुळे म्हणाले, आपल्या विधानांनी जितेंद्र आव्हाड नेहमीच धार्मिक तेढ निर्माण करत असतात. महाराष्ट्रातील सगळ्या समाजात एकवाक्यता असून अशा वेळी आव्हाडांनी ओबीसींना हिणवण्याचा जो प्रकार केला तो निंदनीय आहे. त्यांना ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही. त्यांनी जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही असा इशारा देत ओबीसी समाजाची आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.