दुर्दैवी: स्वर्णवला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू

पुणे: बाणेर येथील अपहरण झालेल्या मुलगा डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेड वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता संतोष राठोड ( वय 36) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला डुग्गू बुधवारी सापडला. त्यानंतर त्याचे सर्व कुटुंबीय आनंदात होते. याच आनंदाच्या भरात डुग्गूला भेटण्यासाठी नांदेडहुन त्याचे नातेवाईक निघाले होते. नांदेडहुन येत असताना अहमदनगरजवळ त्यांच्या चार चाकी कारला अपघात झाला. यामध्ये सुनिता राठोड यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. समर राठोड (वय 14) अमन राठोड (वय 6) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!