पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या भागातील नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीआण्णांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द भागातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान पाटील यांच्या उपस्थितीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी एक मताने आणि एक दिलाने महायुतीचे उमेदवार मुरली आण्णा यांना विजयी करण्यासाठी संकल्प केला.
तसेच यावेळी सदर भागातील विविध ज्ञाती संस्थांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मुरलीआण्णांना जाहीर पाठिंबा दिला, याबद्दल सर्वांचे महायुतीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले . आजच्या संवाद कार्यक्रमाने चित्र पाहता मुरलीआण्णांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील याची म्हटले. याप्रसंगी, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.