अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजण हिताय, या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज बजेट सादर केले. या बजेटकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय , व्यवसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना याची उत्सुकता होती. सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले कि, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला  अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजण हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकारचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असतांना गरीब , मद्यमवर्गीय , शेतकरी , उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला असल्याचे फणवीस यांनी म्हटले.
पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हंणतोय त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्प्ष्टपणे दाखवला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ग्रीनन बजेट , ग्रोथ बजेट याला म्हणता येईल. पायाभूत सुविधांचे बजेट म्हणता येईल. मध्यमवर्गीयांचे बजेट म्हणतां येईल. अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या मध्यमातून मोठ्याप्रमाणात मदत मिळत आहे.
फडणवीस यांनी पुढे म्हटले कि, दहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक हि देशात मोठ्या प्रमणावर रोजगार निर्मिती करणारी आहे. २७ कोटी लोक ईपीएफओच्या अंर्तगत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षात औपचारिक क्षेत्रात वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.