सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – हसन मुश्रीफ

मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यात वाद विवाद सुरु आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यावर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. यावरून मुश्रीफ यांनी सोमय्या  याच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांनी म्हटले कि, माझ्या बदनामीसाठी षडयंत्र आखलं जात आहे. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले. काल किरीट यांनी बेताल , खोटी आणि लोकांच्या द्वेष पसरवणारी वक्तव्ये केल्याने मी त्याचा निषेध करत आहे. शेतकऱ्यांच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही कर्ज घेतले याचा लाभ पाहुण्यांना झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आरोप केले. हे सर्व आरोप खोटे आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले.

किरीट सोमय्या यांना बघायचे असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो. ४० हजार शेतकऱ्यांच्या नावावर १० हजार प्रमाणे शेअर्स घेतलेआहेत. या शेअर्सचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देत असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. मी त्याचा निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!