एवढ्या मोठ्या ‘काऊ’ला त्यांनी ‘हग’ केल्यामुळे दुसऱ्या गायींचं या देशात काय राहिलंय?, संजय राऊतांचा मोदींना टोला

केंद्र सरकारकडे  सध्या एक नवा प्रस्ताव आला असून त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला cow hug day जाहीर करून या दिवशी गायींना मिठी मारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारमधील प्राणिसंवर्ध मंडळाकडून देण्यात आला आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असून या  दिवशी गोमातेवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी “काऊ हग डे” साजरा करण्याचं आवाहन करण्यात आल आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी म्हटले  कि,आमची याकडे बघण्याची इच्छाच नाहीय. कारण त्यांची होली काऊ म्हणजे अदाणी. अदानींना हग करून ते बसले आहेत. त्याला आम्ही होली काऊ म्हणतो. एवढ्या मोठ्या काऊ ला त्यांनी हग केल्यामुळे दुसऱ्या गायीचं या देशात काय राहिलंय ? आम्हाला अडाणीला ह्ग करता येत नाही, म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय गोमाता आहे, त्या गोमातेचा आम्ही आदर करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राऊत पुढे म्हणाले कि, आम्हाला त्यांनी मिठ्या मारायला गायी दिल्या आहेत आणि ते अदाणी नावाच्या होली काऊ ला मिठ्या मारत आहेत, असे राऊत यांनी म्हटले. एकूणच राऊत यांनी जोरात टीका केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!