पंतप्रधानांनाच मुंबई पालिका जिंकायची आहे, संजय राऊत यांचा खोचक टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या दौऱ्यावरून टीकास्त्र सोडले आहे. जो पर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरत नाही, किंवा ते ठरवत नाही, तोपर्यंत त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो. करण पंतप्रधानांनाच मुंबई पालिका जिंकायची आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.