सांगलीत भाजपाची ताकद वाढली! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या २ नगरसेवकांचा मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश

12

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ३ पैकी २ नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत जाहीरपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नगरसेवक सुरेश बंडगर आणि युवराज गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्ते भाजपाशी जोडले जात आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

सांगली जिल्ह्यात जनसामान्यांचा भाजपावरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असून पक्षसंघटन आणखी मजबूत होत आहे. यावेळी भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुमित कदम यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.