आनंद दवे यांच्याकडून मविआ चा अजेंडा फॉलो होत आहे, ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष रोहित धोत्रे यांचा आरोप

पुणे : कसबा  मतदार संघात काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक लढवत आहेत. बासरी असे त्यांचे चिन्ह आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यांच्याकडून सुरु असलेला प्रचार हा भाजप विरोधात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

हिंदू महासंघाचे आनंद दवे यांचा प्रचार आता एका पक्षाच्या बाजूने तर एक पक्षाच्या विरुद्ध असा एकांगी सुरू आहे. हिंदू महासंघ जिंकावा म्हणून हा प्रचार सुरू नसून ,भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात सुरु  आहे, असा आरोप हिंदू महसंघाचे कार्यकारणी सदस्य आणि ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष रोहित धोत्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

धोत्रे म्हणाले,  जसा जसा प्रचार पुढे गेला तसा आनंद दवे यांनी एकांगी प्रचार सुरू केला. त्यांच्याकडून मविआ चा अजेंडा फॉलो होत आहे. भाजपचा उमेदवार पडावा म्हणून हा प्रचार सुरू आहे.  प्रचाराच्या काळात भाजपकडून एकत्र वेगळे न लढता एकत्र लढवू अशी विचारणा झाली होती. प्रचाराच्या काळात पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे, भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे मी दवे यांचा प्रचार करणे थांबविला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!