मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आज मराठी भाषा दिन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केली. मराठी भाषेचे वय अडीच हजार वर्षे आहे. मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. त्यासाठी राजकारण मध्ये न आणता पाठपुरावा केला जावा, अशी आग्रही मागणी छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

विधानसभेत वंदे मातरम्‌  व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार,  महसूलपशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितग्राम विकास आणि पंचायती राजवैद्यकीय शिक्षणक्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजनपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे,यांच्यासह सन्माननीय मंत्रीविधानसभा सदस्य उपस्थित होते.