अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन द्यावे – अजित पवार

6
विधिमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत. इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकास मंत्री हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला.
अजित पवार यांनी सभागृहात म्हटले कि, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारत असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागात किमान दहा हजार महिना मिळाल्यास कुटुंबात चूल पेटली जाते. गॅसचे दर वाढले असून ग्रामीण भागात रॉकेलही दिले जात नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली.
पोषण ट्रॅकर अॅपमध्ये अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्याची प्रणाली इंग्रजीमध्ये आहे. मात्र ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या महिलांचा विचार करून ही माहिती मराठीमध्ये भरण्याची सुविधा का केली जात नाही, असा सवाल अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.