कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले, आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप – शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. या सभेतनंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी या भाषणावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले, अशी टीका शेलार यांनी केली.
 
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले कि, कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले, अशी टीका शेलार यांनी केली.

 

शेलार पुढे म्हणाले कि, आधे इधर गए… आधे उधर गए..

अकेले “असरानी” बचगएं. आता महाराष्ट्रात “असरानी” जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..!, अशा शब्दात शेलार यांनी उपहासात्मक टीका केली.