आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्यावर टीका करताना स्‍नेहल जगताप-कामत यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी – निलीमा घोसाळकर

678

महाड :  निजामपूर येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी गद्दाराचा मतदार संघ म्‍हणून महाड मतदार संघ ओळखला गेला आहे तो डाग पुसायचा आहे अशी जहरी टीका स्‍नेहल जगताप-कामत यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावर केली. त्‍या टीकेला शिवसेना महिला आघाडी जिल्‍हा संघटीका निलीमा घोसाळकर यांनी जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले . शुन्य कर्तुत्‍व असताना केवळ महिला आरक्षण आणि वडिलांच्या पुण्याईने महाड नगरपरिषदेचे 5 वर्षे मिळालेले नगराध्यक्ष पद हे महाडकरांना ‘सेवा’ देण्याऐवजी कट,कमिशन,करप्शन चा ‘मेवा’ खाण्यात ज्‍यांनी घालवले त्‍यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावर टीका करणे म्‍हणजे निर्लज्‍जपणाचा कळस आहे.

ज्‍यांनी लहानाचे मोठे करून तुम्‍हांला राजकारणात मानाचे स्‍थान दिले त्‍या वडीलांच्या विचारांशी गद्दारी तुम्‍ही केलीत, ज्‍या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुमचे वडील आमदार झाले, तुम्‍ही 5 वर्षे नगराध्यक्ष झालात, त्‍या काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून आमदारकीची तिकीट मिळविण्यासाठी उबाठा गटात बेडूकउडी मारलीत, म्‍हणूनच गद्दार ही उपमा स्‍नेहल जगताप-कामत तुम्‍हांला तंतोतंत लागू होईल. आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावरती टीका करताना आपण जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी, असे जोरदार प्रत्‍युत्‍तर निलीमा घोसाळकर यांनी दिले.

नशिबाने महाड सारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्ष पद सांभाळून सुध्दा तुम्‍हांला तुमचे कर्तुत्‍व सिध्द करता आले नाही, अजूनही तुम्‍हांला माजी आमदार माणिक जगताप यांची मुलगी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून द्यावी लागते, याच्यापेक्षा दुर्देव दुसरे नाही. सात जन्मासाठी विवाह बंधनांत अडकल्‍यानंतर स्‍वत:च्या नावासोबत पतीचे नांव जोडणे ही एका पत्‍नीसाठी भाग्‍याची आणि अभिमानाची बाब असते, पण स्‍वत:च्या राजकीय स्‍वार्थापोटी आणि अकार्यक्षमतेमुळे तुम्‍ही आजही वडीलांचे नांव लावूनच आपली राजकीय पोळी भाजत आहात, ही शोकांतिका आहे. तुम्‍ही उबाठा गटामध्ये प्रवेश केल्‍यानंतर जी मनमानी आणि गुंडगिरी सुरू करून निष्‍ठावंत शिवसैनिकांवर जो अन्याय करत आहात , एकेकाची पदे काढत आहात त्‍याचसाठी गुंडगिरी, मनमानी या शब्‍दांचे प्रयोग केल्‍याबददल आपले अभिनंदन! बेडूक कितीही फुगला तरी त्‍याचा बैल होऊ शकत नाही त्‍याचप्रमाणे तुम्‍ही कितीही वल्‍गना केल्‍यात तरी येत्‍या विधानसभा निवडणूकीत डिपॉझीट रक्‍कम वाचवतानाच तुम्‍हांला दम लागेल, हे नक्‍की!!

आमदार भरतशेठ गोगावले साहेब आम्‍हां सर्व पदाधिकारी यांना सांगतात, स्‍नेहल ही मुलीसारखी आहे तीच्यावर कोणीही काही टीका करू नका, बोलू नका म्‍हणून आम्‍ही सर्वजण शांत होतो. पण जर तुमच्याकडून सातत्‍याने आमदार साहेबांवरती नीच पातळीवर जाऊन टीका होत असतील तर शिवसेना महिला आघाडी त्‍या टीकेला जशास तसे उत्‍तर दिल्‍याशिवाय शांत बसणार नाही हा ईशारा देत आहोत.

आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांची महाड मतदार संघातील गोरगरीब जनतेशी जोडलेली आपुलकीची, प्रेमाची, विकासाची नाळ अतुट आहे. महाड-माणगांव-पोलादपूर विधानसभा मतदार संघातील जनतेला अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी झटणारा आमदार हवा आहे, म्‍हणूनच आमदार साहेब सलग चौथ्‍यांदा मोठ्या मताधिक्‍याने सहज विजयी होतील, विजयाची केवळ औपचारीकता बाकी आहे. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या 2024 च्या निवडणूकीतील विजयाचा सर्वात मोठा वाटा हा लाडक्‍या बहीणींचा, माय-माऊलींचा असेल असेही शिवसेना महिला जिल्‍हा संघटीका निलीमा घोसाळकर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.