आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : आज युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प दुपारी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वित्तमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आज दुपारी २ वाजता विधानसभेत मांडतील. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जनतेच्या सूचना व मतांचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.