हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी योजनांमुळेच – चंद्रकांत पाटील

4

मुंबई  : गेली कित्येक वर्षे निराश व निराधार योजनांमुळे देशातील शेतकरी विकासापासून दूर होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज देशातील शेतकऱ्यांचा विकास स्पष्ट दिसत आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी योजनांमुळेच असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती होती. चंद्रकांत पाटील यांनी या मोदी सरकारच्या आधी आणि नंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीतील बदल समोर आणला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

१. कृषी मंत्रालयाचा अर्थसंकल्प – २०१३- १४ मध्ये ३०, २२४ कोटी इतका होता आणि  २०२३ – २४ मध्ये ०१. ३१ लाख कोटी रुपये इतकी वाढ करण्यात येईल.
२. कृषी क्षेत्रासाठी संस्थात्मक कर्ज – २०१३ – १४ मध्ये ७. ३ लाख कोटी तर २०२३- २४ मध्ये १८. ५ लाख कोटी
३. भातासाठी एमएसपी – २०१३- १४ मध्ये १,३१० प्रति क्विंटल तर २०२३ -२४ मध्ये २, ०४० प्रति क्विंटल
४. गव्हासाठी एमएसपी – २०१३- १४ मध्ये १, ४००प्रति क्विंटल तर २०२३ -२४ मध्ये २,१२५ प्रति क्विंटल
वरील सर्व शेतकऱ्यांच्या योजनांसाठी मोदी सरकारने अधिक वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी योजनांमुळेच हे या आकडेवारीतून नक्कीच स्पष्ट होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.