एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय राऊत

येत्या २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज मालेगावमध्ये उपस्थित होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही.  तसेच मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या दादा भुसे यांनी टोला लगावला. राज्यातील मुस्लिम समाजही आमच्या पाठीमागे असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले कि, राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात सरकार आहे कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही घरी जावे लागू शकते हे त्यांना माहित आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं राऊत यांनी म्हटले.
राऊत यांनी यावेळी निवडणुकीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले कि विधानसभा आणीन लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार आहोत. जागा वाटपावरुन कोणताही वाद होणार नाही, याची खात्री मी देतो असे राऊत यांनी म्हटले. ज्या मोठ्या महापालिका आहेत त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ठ केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!